हिंदुस्थानच्या नवनिमार्णासाठी महिलांचा संघर्ष

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 8 मार्च 2019

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या अधिकारांसाठी आणि एका नव्या समाजासाठी संघर्ष करत असणाऱ्या हिंदुस्थानातील आणि सर्वच जगातील लक्षोवधी महिलांना हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सलाम करते!

जगातील सर्व देशांत महिला म्हणून आणि एक मानव म्हणून महिला त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत. कष्टकरी पुरुषांच्या खांद्याला खांदा जोडून, भांडवलदारी शोषण, साम्राज्यवादी हल्ले आणि युद्धाला संपविण्याची मागणी त्या करीत आहेत.

हिंदुस्थानी महिलांनी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध मौन तोडण्याची हिंमत केली आहे. आपल्या कामगार बंधूबरोबर, आपल्या कामगार भगिनी रोजगाराची सुरक्षा आणि श्रम अधिकारांच्या संघर्षात आघाडीवर आहेत. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा अधिकार आणि भूमी मालकीच्या सुरक्षेच्या संघर्षात महिलांनी आघाडी घेतली आहे. देशातील अनेक प्रदेशांत सैनिक शासनामुळे होणाऱ्या नवतरुणांच्या निर्दयी हत्यांच्या विरुद्ध आणि अत्याचाराविरुद्ध महिला आघाडीवर आहेत.

2018 मध्ये जगभरात आणि आपल्या देशात देखील, कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध महिलांनी आपला आवाज बुलंद केला होता. महिला आत्ता हे सहन करणार नाहीत की, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत राहावा, त्यांनी ते मुकपणे सहन करावे, होणाऱ्या अत्याचारासाठी महिलांना दोषी ठरविले जावे आणि खरे अपराधी निर्दाष म्हणून मोकाट सुटावेत. 22 फेब्रुवारी 2019ला लैंगिक हल्ल्यांच्या पीडित 5000हून अधिक महिलांनी प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याच्या अधिकाराची मागणी करत एक विशाल जननिदर्शन केले.

प्रतिष्ठेसाठीच्या निदर्शनात सामील झालेल्यापैंकी आघाडीवर एक अशा भंवरी देवी होत्या. 25 वर्षांपूर्वी बाल विवाह रोखण्यासाठीचा सरकारी कार्यक्रम लागू करण्याच्या दरम्यान त्यांच्यावर क्रूरपणे बलात्कार केला गेला होता. त्या भयानक कृत्यासाठी जबाबदार अपराध्यांवर आजतागायत कोणतीही शिक्षा झालेली नाहीय. उत्तर प्रदेशातील मुज्जफरपूर मधील एका अनाथ आश्रमात, अनाथ महिलांवर आणि बालिकांवर त्या अधिकाऱ्यांनीच वारंवार बलात्कार केला ज्यांना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. ह्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी, हे प्रकार थांबविण्यासाठी काहीच कारवाई केली जात नाहीय. सरकार विविध कमीशन्स नेमणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, महिलांसाठी विशेष कार्यक्रम सुरू करणे ह्यांसारख्या घिस्या पिट्या पारखलेल्या पाऊलांचा आधार घेत आले आहे. महिलांवर होणाऱ्या शोषण आणि दमनाला संपविण्याच्या मागणी करणाऱ्यांचा राग शांत करणे हाच अशा पावलांमागे हेतू असतो.

आपल्या राज्यकर्त्या वर्गाला हिंदुस्थानच्या ”आर्थिक संर्वधनावर” खूप गर्व आहे. परंतु आपल्या देशात भांडवलदारी विकासासोबत, पुराण्या, पिछाडीच्या रितीरिवाजांना तिलांजली देण्यात आलेली नाहीय. जातीच्या आणि लिंगाच्या आधारावर शोषण-दमन अजूनही संपुष्टात आलेले नाहीय. मोठ्या संख्येने आज महिला नोकरी करत आहेत, परंतु आजवर समान कामासाठी समान वेतन त्यांना मिळत नाहीये.

भांडवलदारीच्या विकासाने पितृसत्तेचा अंत झालेला नाहीये. उलट भांडवलदारी विकासाच्या वाटेवर चालताना, समाजात महिलांचे स्थान अजूनच ढासळले आहे. रस्त्यांवर आणि सार्वजनिक स्थानांवर महिलांना वारंवार लैंगिक हिंसा आणि बलात्काराच्या धोक्याचा सामना करावा लागतोय. अशा घटना आज अपवाद नाहीत तर स्वाभाविक बनल्या आहेत.

महिलांवर अत्याचार आणि महिलांचा अनादर करणे वर्तमान आर्थिक व्यवस्थेचा आणि त्याचे रक्षण करणाऱ्या राजनैतिक व्यवस्थेचा अनिवार्य भाग आहे.

हिंदुस्थानच्या राज्यघटनेच्या निती-निर्देशक तत्त्वांमध्ये लिहले आहे की, महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळतील, की महिलांना शोषण-दमनमुक्त केले जाईल, परंतु हे केवळ धोरणात्मक उद्देश्यच आहेत, जे भविष्यात कधीतरी कदाचित पूर्णत्वास उतरण्याचा दावा केला जातो. हे नाही मिळाले तर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही.

आपली राज्यघटना राज्याला पूर्ण अधिकार देते की कायदे व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लोकांचे ”मुलभूत हक्क” ते हिरावून घेऊ शकते. महिलांच्या अधिकारांचीदेखील कोणतीच हमी नाहीये. वास्तविकपणे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी महिलांचे अधिकारांचे हनन केले जाते. छोट्यात छोट्या अधिकारासाठी महिलांना रस्त्यावर येऊन आवाज उठवावा लागतो.

राज्यघटनेप्रमाणे, निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रीमंडळाच्या हाती संकेंद्रित आहे. मंत्रीमंडळ संसदेत बहुमतात असलेल्या पार्टीच्या सदस्यांतून गठित केले जाते. हे मंत्रीमंडळ मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वातील भांडवलदार वर्गाच्या हितांत कायदे बनवते आणि धोरणे लागू करते. विरोधी पक्ष सरकारच्या पावलांच्या विरुद्ध खूप आरडाओरडा करतात व सत्त्तेवर येण्याच्या आपल्या पाळीची वाट बघतात.

संपूर्ण राजनैतिक व्यवस्था मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वात भांडवलदार वर्गाची मनमर्जी लागू करण्यासाठी बनविण्यात आलेली आहे. राजनैतिक शक्ती ह्या मूट्ठीभर शोषकांच्या हातांत आहे आणि हेच पूर्ण समाजाची दिशा निर्धारित करतात . जेव्हा लोकांचा राग पराकोटीला पोचतो तेव्हा राज्यकर्ता वर्ग निवडणूका आयोजित करून आपले प्रबंधक दल बदलतो. एका पार्टीच्या जागेवर दुसरीची नेमणूक होते परंतु अर्थव्यवस्थेच्या आणि सरकारच्या धोरणांची दिशा बदलत नाही. प्रत्येक नवनिर्वाचित सरकार उदारीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या त्याच पूर्वापार चालत आलेल्या कार्यक्रमाला नवनव्या पद्धतीने लागू करते.

निवडणूक अभियानांचा हेतू असतो की लोकांना भांडवलदारांच्या ह्या किंवा त्या पार्टीमागे किंवा युतीमागे संघटित करणे. ह्या पार्ट्यांत आपापसांत गळेकापू स्पर्धा चालते आणि धर्म व जातींच्या आधारावर लोकांना फोडण्यात येते. ’फोडा व राज्य करा’ हेच राज्यकर्त्या भांडवलदार वर्गाचे आवडीचे तंत्र आहे.

भाजपा समाजातील सर्व वाईट गोष्टींसाठी काँग्रेस पार्टीला दोषी ठरवते. काँग्रेस पार्टी आणि तिचे मित्रदल भाजपाला ह्या वाईट गोष्टींसाठी जबाबदार मानतात आणि ”लोकशाही वाचवा”ची घोषणा करतात. परंतु वर्तमान लोकशाहीची व्यवस्था वाचवून आपला काहीच फायदा नाहीय, कारण ही लोकशाही मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वात भांडवलदार वर्गाच्या हुकूमशाही व्यतिरिक्त आणखी काही नाहीच.

कष्टकरी महिला व पुरुषांना एकजूट होऊन, भांडवलदार वर्गाच्या वर्तमान सत्तेच्या जागी एक नवी राजनैतिक सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करायला हवा. अशा नव्या राजनैतिक सत्तेत अर्थव्यवस्था लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने चालविली जाईल, भांडवलदारांची लालसा पूर्ण करण्यासाठी नव्हे. ती कामगार-कष्टकरी बहुसंख्येची हुकूमत असेल जी मानवाद्वारे मानवाचे होणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या शोषणापासून मुक्त अशा समाजाची रचना करेल.  ती एक नवे गणराज्य निर्माण करेल, ज्याची एक नवीन राज्यघटना असेल, जे सार्वभौमत्व लोकांच्या हाती सुपूर्द करेल आणि महिलांच्या अधिकारांसोबतच सर्व मानवाधिकारांला अनुल्लंघनीय मानेल.

कम्युनिस्ट गदर पार्टी देशातील महिलांना आवाहन करते की, हिंदुस्थानच्या नवनिर्माणासाठीच्या संघर्षात पुढे या. आपण एक अशी व्यवस्थेची रचना करूया जिच्यात समाजातील उत्पादनकर्ते म्हणून आणि नवपिढीचे जन्मदाते व पालनकर्ते म्हणून महिलांच्या भुमिकेला सन्मान आणि आदर सुनिश्चित होईल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.